हिंगोली जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार.. 

संदीप नागरे
रविवार, 18 एप्रिल 2021

हिंगोली जिल्हा रुग्णालयात केंद्र शासनाच्या आर्थिक साहाय्याने प्राणवायू निर्मिती करणारा प्रकल्प लवकरच हिंगोली जिल्हा रुग्णालयात उभारला जाणारा आहे. या साठी ५० लाख रुपयापेक्षा जास्त निधी खर्च देखील करण्यात आला आहे.

हिंगोली: हिंगोली Hingoli जिल्हा रुग्णालयात केंद्र शासनाच्या Central Government आर्थिक साहाय्याने प्राणवायू Oxygen निर्मिती करणारा प्रकल्प लवकरच हिंगोली जिल्हा रुग्णालयात उभारला जाणारा आहे. या साठी ५० लाख Fifty lakh रुपयापेक्षा जास्त निधी खर्च देखील करण्यात आला आहे. Oxygen production project to be set up in Hingoli district soon

ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पााचे काम अंतिम टप्प्यात आले  असून, केंद्र शासनाच्याा वतीनेे देशातील मोजक्यााच जिल्ह्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे.  त्यात हिंगोली जिल्हा रुग्णालययाचा समावेश करण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाचा Corona विस्फोट झाला आहे.  देशात दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत तर कोरोनाचा विषाणू हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव घेत आहे.  या सगळ्या संकटाचा सामना करताना आरोग्य विभाग आणि यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सीजन आणि रेमिडीसीवर Remedicivir इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला.  यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन टँकर पळविण्याचा प्रयत्न देखील अनेक जिल्ह्यात झाला आहे. अश्या घटना या पुढे घडू नयेत यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. Oxygen production project to be set up in Hingoli district soon

या प्रकल्पातील महत्त्वपूर्ण असलेले कॉम्प्रेसर हे गुजरात Gujrat मधून हिंगोलीत लवकरच  दाखल होणार आहे.  हा प्रकल्प सुरू झाल्यास दररोज या मधून अर्धा टन Half Ton प्राणवायू ची निर्मिती होणार आहे. याची माहिती आरोग्य प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना सह इतर आजारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरीही प्रशासनाने नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live