गाडीतच रुग्णाला ऑक्सिजन, तर रस्त्यावर पॉझिटिव्ह रुग्णाची तडफड

दीपक क्षीरसागर
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

लातूर Latur जिल्ह्याच्या सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील बिदर येथे कोरोनाची भयावह स्थिती दिसत आहे कोरोनाने डोके वर काढल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

लातूर : लातूर Latur जिल्ह्याच्या सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील बिदर येथे कोरोनाची भयावह स्थिती दिसत आहे कोरोनाने डोके वर काढल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बिदर येथील सरकारी ब्रिम्स दवाखान्यात अत्यंत गंभीर परिस्थिती दिसत आहे की दवाखान्यात बेड फुल झालेले आहेत तर वाढत्या रुग्णासंख्येमुळे आॅक्सिजनही  Oxygen कमी पडल्याने ६० कोरोना पाँझेटिव्ह असलेले रुग्ण हे दवाखान्याच्या समोरच तडफडत पडलेले दिसत आहेत. Oxygen Situation Horrible in Karanataka Bidar District

बिदर Bidar येथील सरकारी व प्रायव्हेट दवाखाने हे पुर्णतः भरलेले दिसत आहेत. रुग्णांचे नातेवाईक हे आॅक्सिजन व बेड साठी फिरत आहेत. हे सर्व कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर तडफडत झोपल्याने अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. काहीजणांना खुल्या गाडीतच आॅक्सिजण देत आहेत तर दवाखान्याच्या परिसरात रोडवरती तडफडत झोपलेले रुग्ण दिसत आहेत. दररोज सुमारे हजार ते बाराशे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live