पाकिस्तान, दाऊद, ड्रग्ज आणि बॉलिवूड! वाचा काय आहे कनेक्शन?

साम टीव्ही
बुधवार, 23 सप्टेंबर 2020
  • दाऊद, ड्रग्ज आणि बॉलिवूड !
  • ड्रग्जच्या कारभाराचं पाकिस्तान कनेक्शन
  • पाकिस्तानमधून दाऊद पुरवतोय बॉलिवूडला ड्रग्ज?

दाऊद, ड्रग्ज आणि बॉलिवूड. बॉलिवूडच्या सुंदर चेहऱ्याआड दडलीय ड्रग्जची नशा. हे ड्रग्ज दाऊद पाकिस्तानातून लपून कुणाकुणाला पुरवतोय? कोण आहे बॉलिवूडला ड्रग्ज पुरवणारा हा नशेडी. पाहा.

ड्रग्ज...नशा...आणि काळाधंदा...यामागचा छुपा चेहरा लपलाय पाकिस्तानात. पाकिस्तानातून लपून बॉलिवूडला पाक व्हाया पंजाबमधून ड्रग्ज पुरवला जातोय. ड्रग्ज माफिया हा दुसरा तिसरा कुणी नसून, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचाच हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानात राहायचं आणि बॉलिवूडला नशेच्या जाळ्यात ओढण्याचं काम पाकिस्तानातून केलं जातंय. या जाळ्यात आता बॉलिवूडचा 90 च्या दशकातून ते नव्या कलाकार अडकल्याचं NCB च्या तपासात समोर आलंय.

बॉलिवूडमधील ड्रग्जच्या कारभारात मुंबईत ड्रगचा पुरवठा करणारे कोण आहेत, याचा अंदाज आलाय. हेरॉईन, कोकेनसारखे ड्रग्जचे ग्राहक आणि त्यांना पुरवठा करणाऱ्यांवर आरोप ठेवण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जातायत. आता ड्रगच्या कनेक्शनमध्ये पंजाबच्या अमृतसरमधील एका व्यक्तीला एनसीबी चौकशीसाठी बोलवण्याची शक्यताय...इतकंच नव्हे तर पाकिस्तान कनेक्शन समोर आल्यानं एनसीबीने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या ड्रग्जविरोधी संस्थाचीही मदत मागितलीय.

 

असा होतोय ड्रग्जचा पुरवठा
 

  • कोलंबिया-ब्राझील आणि मोझाम्बिकमार्गे भारतात कोकेन आलं
  • यासाठी आफ्रिका आणि दुबईतून काही ठिकाणांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्यात आला
  • 2018 मध्ये भारतात 1200 किलोग्रॅम कोकेन आलं होतं
  • यातील 300 किलोग्रॅम कोकेन मुंबईत पोहोचलं होतं
  • जून 2019 मध्ये ऑस्ट्रेलियात 55 किलो कोकेन जप्त करण्यात आलं
  • आता यात पाकिस्तान व्हाया पंजाब कनेक्शन समोर आल्याने दाऊदचाही ड्रग्ज कनेक्शनमध्ये हात असल्याचं बोललं जातंय. त्यानुसार आता एनसीबीचा तपास दाऊद, ड्रग्ज आणि बॉलिवूड यादिशेनं करू शकतात अशी माहिती समोर आलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live