इम्रान खान यांनी बोलावली अणुविषयक समितीची बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर  दोन्ही देशातिल हालचालिंना वेग आला आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे. 

पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नॅशनल कमांड ऑथॉरिटीकडं (एनसीए) आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर काल पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. त्यात अणुविषयक समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इम्रान खान यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जातात.  आताही पाककडून असाच दबावाचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली असावी.

Web Title: Pakistan PM Imran Khan calls meeting of top decision making body on nuclear issues

संबंधित बातम्या

Saam TV Live