पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरूच

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

इस्लामाबाद - प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणेच हवेमध्येही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत. पाकने आज पुन्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित सौदी अरेबिया दौऱ्यासाठी आपली हवाई हद्द खुली करण्यास नकार दिला. भारतानेच ही हद्द खुली केली जावी, अशी विनंती पाककडे केली होती; पण पाकिस्तानच्या सरकारने उद्दामपणे ती फेटाळून लावली. काश्‍मीरमधील मानवी हक्काच्या पायमल्लीचा मुद्दा उपस्थित करत पाकने पुन्हा हे कृत्य केले आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी यासंदर्भात एक सविस्तर निवेदनच प्रसिद्ध केले असल्याचे तेथील नभोवाणी केंद्रावरून जाहीर करण्यात आले. काश्‍मिरी जनतेच्या समर्थनार्थ पाकने आज काळा दिवस पाळून भारताचा निषेध केला. या कृत्याचे पुढील पाऊल म्हणून पुन्हा हवाई हद्द भारतासाठी सील करण्याचा निर्णय पाककडून घेण्यात आला आहे. या संदर्भातील लेखी स्पष्टीकरण आम्ही भारतीय उच्चायुक्तांना पाठविले असल्याचेही पाककडून जाहीर करण्यात आले. 

अडेलतट्टू भूमिका 
पंतप्रधान मोदी हे उद्या (ता.28) रोजी सौदी अरेबियाला रवाना होणार असून तेथे ते सौदीच्या नेतृत्वाबरोबरच उद्योजकांशीही संवाद साधणार आहेत. पाकिस्तानने याआधीही सप्टेंबर महिन्यामध्ये मोदींसाठी हवाई हद्द खुली करण्यास नकार दिला होता.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आईसलॅंड दौऱ्याप्रसंगी देखील पाकने अशीच अडेलतट्टू भूमिका घेतली होती. बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने त्याची हवाई हद्द भारतीय नेत्यांसाठी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, भारताप्रमाणेच बॅंकॉक आणि क्वालालंपूरच्या विमानांना देखील पाकने त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे.

Web Title: Pakistan refused to open their air limit for this tour again in Saudi Arabia proposed by the Prime Minister Narendra Modi
 
संबंधित बातम्या

Saam TV Live