भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट, कुणीही सहज तुम्हाला जाळ्यात ओढू शकतं. कारण नाशकातील ही घटना वाचा

साम टीव्ही
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020
  • हेरांच्या भरतीसाठी पाकिस्तानचं जाळं!
  • भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट
  • कोण आहेत भारताचे फितूर?

तुम्हाला अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला तर सावध व्हा. कुणीही सहज तुम्हाला जाळ्यात ओढू शकतं. कारण, हेरांच्या भरतीसाठी पाकिस्तान भारतात जाळं विणतंय. कोण आहेत भारताचे फितूर. ही पूर्ण बातमी वाचा

नाशिक कनेक्शनमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झालीय. पाकिस्तान हेरांच्या भरतीसाठी भारतात जाळं विणतोय. भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान एजंट शोधतोय. मागील आठवड्यात नाशिकमध्ये देवळाली कॅम्प आणि हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमिटेडमध्ये हेरगिरी केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांच्या तपासात ही माहिती समोर आलीय. हेरांच्या भरतीसाठी पाकिस्तान कसं जाळं विणतंय पाहा.

  • हेरांच्या भरतीसाठी हनी ट्रॅप आणि इतर मार्गांचा वापर केला जातोय
  • साध्या लोकांनाही पाकिस्तान आपल्या जाळयात ओढतंय
  • एचएएलमधील कर्मचारीही 2 वर्षांपूर्वी हनी ट्रॅपचा शिकार झाला होता
  • लढाऊ विमान बांधणी आणि संवेदनशील प्रकल्पाची माहिती ISI च्या एजंटकडे पोहोचवीत होता
  • या काळात त्याने बरीच महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानपर्यंत पोचविली
  •  महिनाभरात नाशिकचे दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेलेयत...

पोलिस आयुक्त दीपक पांडे म्हणाले...

त्यामुळे अनोळखी विदेशी व्यक्तींशी संवाद टाळा. अलगदपणे तुम्हाला जाळ्यात अडकवलं जाऊ शकतं. जाळ्यात अडकल्यावर नकळतपणे महत्त्वाची संवेदनशील माहिती काढून घेतात. त्यामुळे सावध व्हा. आणि सावधगिरी बाळगा.


संबंधित बातम्या

Saam TV Live