हजारदा तोंडावर पडूनही पाकिस्तान सुधारत नाही, पाकच्या नव्या नकाशात भारतातल्या अनेक भागांवर डल्ला

साम टीव्ही
शनिवार, 8 ऑगस्ट 2020
  • हजारदा तोंडावर पडूनही पाकिस्तानची मस्ती बघा
  • नव्या नकाशात भारतातल्या अनेक भागांवर डल्ला
  • ही मुजोरी पाकिस्तानला पडणार भारी

पाकिस्तानची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाललीय. पुन्हा एकदा पाकनं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. पण, ही मुजोरी पाकला भारी पडणार आहे.

 

कोरोनाचं संकट असतानाही, नेपाळनं भारताचे भाग स्वत:च्या नकाशात दाखवले होते, भारत सरकारने नेपाळचं कंबरडं मोडूनही ही खुमखुमी आता पाकिस्तानला आलीय. कारण, पाकिस्तानने जाहीर केलेल्या नव्या नकाशात भारतातील काही भाग दाखवले आहेत.
पाकिस्ताननं नव्या नकाशात काश्मिरसह लडाख स्वत:च्या नकाशात दाखवले आहेत. त्याचसोबत गुजरातमध्ये असलेला जुनागढ नावाचा प्रदेशही पाकिस्नाननं स्वत:च्या नकाशात दाखवलाय. इतकंच नाही तर, सियाचीन, सर क्रिक भूभागही पाकिस्ताननं स्वत:च्या नकाशात दाखवलंय.

आधी नेपाळ आणि आता पाकिस्तान... या छोट्या देशांची ताकद नसतानाही ते भारताविरोधात कुरापती करतायत. त्यामुळे, या छोट्या देशांना पडद्याआडून कोण नाचवतंय, हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे, चीनच्या नादी लागून भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळ आणि पाकिस्तानला अद्दल घडवायलाच हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live