चीननंतर पाकिस्तानची भारताविरोधात खेळी, पाकिस्तान करणार नव्या प्रांताची घोषणा

साम टीव्ही
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020
  • चीननंतर पाकिस्तानची भारताविरोधात खेळी
  • पाकिस्तान करणार नव्या प्रांताची घोषणा
  • गिलिगत-बाल्टिस्तान बनणार पाचवा प्रांत

सीमेवर आता भारताला एककीडे चीनच्या कुरापतींना उत्तर द्यायचंय, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या चालीही परतवून लावायच्यात. अशातच आता पाकिस्तान भारताविरोधात एक नवी खेळी करतोय. बघुयात काय आहे पाकिस्तानची नवी खेळी.

लडाख सीमेवर भारत चीनला प्रत्युत्तर देतोय. तर इकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हालचालीही सुरु झाल्यात. या भागात पाकिस्तान आता एक वेगळी खेळ करण्याच्या तयारी आहे. लवकरच पाकिस्तान एका नव्या प्रांताची घोषणा करण्याची शक्यता आहे. गिलिगत-बाल्टिस्तान पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनणार आहे. 

काय आहे पाकिस्तानची खेळी
गिलगित-बाल्टिस्तानाला प्रांताचा दर्जा देण्याची तयारी पाकिस्तानने केलेय. दोन्ही सदनामध्ये या प्रांताला प्रतिनिधित्वही दिलं जाईल. या माध्यमातून पीओकेमध्ये आपलं थेट नियंत्रण स्थापित करण्यचा पाकिस्तानचा डाव आहे. याच भागात पाकिस्तान चीनच्या बेल्ट अँड रोडच्या योजना सुरु करण्याच्या विचारात आहे... भारताने आधीच या योजनेला विरोध दर्शवला होता.

मुख्य म्हणजे पाकिस्तान करत असलेल्या या नव्या बदलांवर भारताकडूनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आदिलेली नाही. मात्र यापूर्वी भारताने अनेकदा याचा विरोध केलेला आहे.. त्यामुळे पाकिस्तानने या निर्णयाची घोषणा करताच भारत-पाक सीमेवर तणावाची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live