प्रचार पोटनिवडणुकीचा, फटकेबाजी नेत्यांची

भारत नागणे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा  जाहीर प्रचार आज सायंकाळी संपणार आहे. येत्या १७  एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मागील दोन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पंढरपूरात जाहीर सभा झाल्या. या सभेत नेत्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. या या शाब्दिक फटाक्यांचा हा आढावा....

पंढरपूर: मंगळवेढा - पंढरपूर Pandharpur Mangalwedha विधानसभा पोटनिवडणुकीचा  जाहीर प्रचार आज सायंकाळी संपणार आहे. येत्या १७  एप्रिल रोजी मतदान Voting होणार आहे. मागील दोन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पंढरपुरात Pandharpur जाहीर सभा झाल्या. या सभेत नेत्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. या या शाब्दिक फटाक्यांचा हा आढावा....Pandharpur Bi Election What Leaders said about one another

या सरकारचा मी करेक्ट कार्यक्रम करतो
महाविकास आघाडीचे शंभर दिवस भरले आहेत. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या रूपाने एक आमदार निवडून द्या,राज्यातील सरकारचा मी करेक्ट कार्यक्रम करतो असा सूचक इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी दिला.होता.

सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटला का
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची  उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी काल रात्री पंढरपुरातील शिवाजी  चौकातील जाहीर सभेत  खिल्ली उडवली.महाविकस आघाडीचं हे सरकार जनतेच्या विश्ववासावर बनलं आहे. सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटला काय  ... आमचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवार यांनी पलटवार केला.

आपला नाद कुणी करायचा नाही
दरम्यान दोन दिवसापूर्वी पंढपुरात ही पाऊस झाला. भाजप नेत्यांही पावसात सभा घेतल्या. यावेळी भाजप नेत्यांनी शरद पवारांच्या Sharad Pawar सातारच्या पावसातील सभेवर टिका केली होती. त्याचा धागा पकडून अजित पवारांनी विरोधकांची चांगलीच कान उघाडणी केली.आपला  नाद कुणी करायचा नाही. कुणी केला तर त्याला असा तसा सोडत नाही.  नक्कल करणं म्हणजे काय जाकिटं बदलण्या सारखं आहे काय असा टोलाही त्यांनी भाजप BJP नेत्यांना  लगावला Pandharpur Bi Election What Leaders said about one another

फडणवीस पाच वर्षे टिकतील का?
सरकार पाच वर्षे टिकेल. पण देवेंद्र फडणवीस हे  विरोधी पक्षनेते म्हणून  पाच वर्षे टिकू शकतील का  याची खरी चिंता आहे.एवढा दम  असणं सोप काम नाही.  पाच  वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राहायचं,असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनीही देवेंद्र फडणवीस यांना कालच्या  सभेत लगावला...

शिवसेना भाजपचं लव मॅरेज होतं
मागील अनेक वर्षे राज्यात शिवसेना Shivsena आणि भाजपचं लव मॅरेज होतं. नवरी कोण आणि नवरदेव कोण यापेक्षा लफडं होतं हे पक्कं होतं. पण ते आता मोडलं आहे.. माझ्या शिवसेनेतील 36 वर्षाच्या काळात मी पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या घडयाळयाला मत मागतोय...माझी केसं गेल्याने मला जे ओळखतं होते त्यांनी पण ओळखलं नाही अशी कोटी करत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी ही चांगलीच फटकेबाजी केली.

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live