सोलापूर महिला आघाडी अध्यक्षा शैला गोडसे यांची शिवसेनेतून हकालपट्टी ..

भारत नागणे
बुधवार, 31 मार्च 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला सध्या एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपमधील लढाईमुळे अत्यंत गाजत वाजत सुरु असलेल्या  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला दररोज वेगवेगळे वळण मिळत आहे. 

पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur Assembly by-election) महाविकास आघाडीला सध्या एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपमधील (BJP) लढाईमुळे अत्यंत गाजत वाजत सुरु असलेल्या  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला दररोज वेगवेगळे वळण (New Twist) मिळत आहे. Pandharpur by-election candidate Shaila Godse expelled from Shiv Sena

पंढरपूर (Pandharpur) विधानसभा पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) सोलापूर (Solapur) जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडाचे (Rebellion) निशाण फडकावले आहे. शैला गोडसे यांनी भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त पदाच्या उमेदवारीसाठी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात अर्ज भरला होता. आणि याचा थेट परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (NCP) यांच्या संबंधांवर पडला असता. या कारणामुळे शिवसेनेतून शैला गोडसे यांची शिवसेनेकडून हकालपट्टी (Expulsion) करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शैला गोडसे यांची पक्षातूनहकालपट्टी केली.  

शैला गोडसे या गेल्या निवडणुकीपासून  विधानसभा उमेदवारी ची अपेक्षा होती, मात्र त्यावेळेसही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या हाती निराशाच आली.  त्यामुळे यावेळेस पाठबळ देणारी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.स्वाभिमानी शेतकरी संघटने पाठोपाठ आता शिवसेनेतही बंड झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे कि काय असा प्रश्न पडत आहे. Pandharpur by-election candidate Shaila Godse expelled from Shiv Sena.
Edited by-Sanika Gade.


संबंधित बातम्या

Saam TV Live