पंढरपुरातील व्यापारी मिनी लाॅकडाऊनच्या विरोधात; उद्यापासून उघडणार दुकाने

भारत नागणे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

राज्यात सध्या कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोना सुपरस्प्रेडर टॉपटेन हॉटस्पॉट शहरांत आता सोलापूर जिल्ह्याचे नांव आले आहे

पंढरपूर :  राज्यात सध्या कोरोनाचा (Corona) फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोना सुपरस्प्रेडर टॉपटेन हॉटस्पॉट (Hotspot) शहरांत आता सोलापूर जिल्ह्याचे नांव आले आहे. दिवसागणिक आकडे सुद्धा वाढत चालले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपुर मध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. (Pandharpur Merchants get aggressive against mini lockdown) त्यामुळे आजपासून पंढरपूर (Pandhrpur) शहर व तालुक्यातील सर्व दुकाने बंद केली आहेत. या निर्णयाविरोधात आज पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चक्क प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. उद्यापासून दुकाने उघडण्याचा निर्णय येतील व्यापारी महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी आमदार प्रशांत परिचारक (Parshant Paricharak) यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी मोबाईल वरून  संवाद साधला असता. 

यावेळी फडणवीस यांनी येथील व्यापाऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सरकारकडे या बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.निवडणुकीतील प्रचार सभेतील गर्दी चालते, मग दुकान उघडण्यावर निर्बंध का असा सवाल आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित करत पोलिसांना  काय कारवाई करायची ती करावी. परंतु दुकाने उघडली जातील अशी ठोस भूमिका त्यांनी हाती घेतली आहे.

 

Edited By - Digambar Jadhav. 


संबंधित बातम्या

Saam TV Live