परमबीर सिंग यांना अटक होणार? उच्च न्यायालयाकडे लागले लक्ष

सूरज सावंत
बुधवार, 9 जून 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अटकेबाबत आज  निर्णय अपेक्षित आहे. अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग Parambir Singh यांच्या अटकेबाबत आज  निर्णय अपेक्षित आहे. अकोल्यातील Akola पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. Parambir Singh Fate to be decided by High Court Today

राज्य सरकारने उच्च न्यायालयात High Court ॲट्रॉसिटी च्या प्रकरणात ९ जून पर्यंत परमवीर सिंग यांना अटक करणार नसल्याची हमी दिली होती.आज ती मुदत संपत आहे. आज उच्च न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हे देखिल पहा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना अॅट्राॅसिटीच्या प्रकरणात येत्या नऊ जून पर्यंत अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात देण्यात आली होती. तोपर्यंत परमबीर सिंग यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहाय्य करावं, अशी विनंती राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला केली होती. Parambir Singh Fate to be decided by High Court Today

महाराष्ट्र जिंकतोय - कोरोना हरतोय

पोलिस Police निरीक्षक घाडगे यांनी  परमबीरसिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीरसिंग यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने माझ्याविरोधात त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार घाडगे यांनी केली आहे. त्यावरुन परमबीर सिंग उच्च न्यायालयात गेले आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live