परमबीरसिंग यांच्या आरोपांची होणार सीबीआय चौकशी: अनिल देशमुखांना धक्का

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांवर प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे

मुंबई :  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे यामुळे अनिल देशमुख आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. Parambir Singhs allegations now will be investigated by the CBI

परमबीर सिंग यांच्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने आज फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मुंबईच्या वकिल जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी न्यायालयात देशमुख तसेच वाझे (Sachin Vaze) यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआला येत्या १५ दिवसांमध्ये करावी लागणार आहे. सीबीआयने १५ दिवसांत चौकशी करुन न्यायालयाला अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांना परमबीरसिंग यांनी बदली आपली बदली झाल्यावर एक पत्र लिहिले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला दर महिन्याला   १००  कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप त्यात होता. वाझे याला हॉटेल, बार आणि इतर आस्थापनांमार्फत एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी केला होता.

काही महिन्यांपूर्वी गृहमंत्र्यांनी वाझे यांना शासकीय निवासस्थानी भेटायला अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी आदेश देत असत असेही परमबीर सिंग यांचे म्हणणे आहे. Parambir Singhs allegations now will be investigated by the CBI

यानंतर चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंगनी केली होती. त्यावेळी न्यायालयाकडून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. 

Edited by-Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live