परभणीत पेट्रोलचे शतक पार !

petrol pump
petrol pump

परभणी : गेल्या अनेक महिन्यांपासुन पेट्रोलच्या Petrol  किमतीत सातत्याने वाढ Increasing होत आहे, परभणीत तर आज पेट्रोलच्या किमतीने गगनभरारी घेतली असून परभणीत आज पेट्रोलच्या भावात पुन्हा 21 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल ने शतक पार केल्याने पेट्रोलचे दर 100 रुपये 26 पैसे प्रतिलिटर तर डिजेल Diesel मध्ये 34 पैशांची वाढ होत 90 रुपये 12 पैसे तर पॉवर पेट्रोल 103 रुपये 61 पैशांनी  महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ पोहचत आहे. Parbhani crosses petrol century 

राज्यातील Maharashtra सर्वात जास्त महाग दराने पेट्रोल आणि डिझेल परभणीकरांना Parbhani खरेदी करावे लागत आहे. परभणीत मागील वर्षी 4 ऑक्टोबरमध्ये पेट्रोलचा 93 रुपये 13 पैसे इतका उच्चांकी दर होता, हा दर मोडीत निघाला असून आज परभणीत वाहन धारकांना  पेट्रोल 100 रुपये 26 रुपये इतक्या दराने खरेदी करावे लागत आहे. परवा पेट्रोलचा भाव 100 रुपये 05 पैसे होता त्यात आता नव्याने 21 पैसे वाढ होत 100 रुपये 26 पैसे झालाय .तर डिजेल परवा 89 रुपये 78 पैसे होते त्यात 34 पैशांची वाढ  होत 90 रुपये 12 पैसे झाले आहे. तर पॉवर पेट्रोल 103 रुपये 61 पैसे झाले आहे. 

हे देखील पहा -

कोरोनामुळे Corona आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना पेट्रोल डिझेल च्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून सरकारविरोधात Government नाराजीचा सूर पसरत आहे.

 कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.  अश्या कठीण काळात गेल्या वर्षभरापासून हाताला काम नसून जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नाही. शेतीवरच जिल्हाचे अर्थकारण अवलंबून आहे त्यात पेट्रोल डिझेल चे भाव हे सातत्याने वाढात आहेत. पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे आता डिजेल सेंचुरी करते की काय अशी भीती सामान्यांना वाटत आहे. Parbhani crosses petrol century

Edited By - Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com