परभणी जिल्हा बँक निवडणूक; अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपूडकर यांची बिनविरोध निवड

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

आमदार वरपुडकर हे जिल्हा बँकेचे बिनविरोध अध्यक्ष झाले. अध्यक्ष पाठोपाठ उपाध्यक्ष पदी राजेश गोरेगावकर यांची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली.

परभणी: अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज परभणी (Parbhani) जिल्हा बँकेच्या सभागृहात सर्व सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी 11 वाजता अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल केले गेले. आमदार (MLA) सुरेश वरपूडकर आणि त्यांची सुनबाई  प्रेरणा वरपूडकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. आणि उपाध्यक्षपदासाठी राजेश गोरेगावकर यांनी अर्ज दाखल केला होता. (Parbhani District Bank Election Results)

प्रेरणा वरपूडकर यांनी अध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आणि आमदार वरपूडकर हे जिल्हा बैंकेचे बिनविरोध अध्यक्ष झाले. अध्यक्ष पाठोपाठ उपाध्यक्ष पदी राजेश गोरेगावकर यांची सुद्धा निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी केली आहे. प्रेरणा वरपुडकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आमदार वरपुडकर हे जिल्हा बँकेचे बिनविरोध अध्यक्ष झाले. अध्यक्ष पाठोपाठ उपाध्यक्षपदी राजेश गोरेगावकर यांची सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत वरपुडकर गटाने २१ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचे विरोधक माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला मात्र ९ जागांवर समाधान मानावे लागले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे जिल्हा बॅंकेत देखील आघाडी होणार असे चित्र होते. परंतु वरपुडकर हे खऱ्या शेतकऱ्यांना डावलून शहरी उमेदवार लादत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी केला होता. एवढेच नाही तर त्यांनी बोर्डीकर गटाच्या प्रचार सभांना हजेरी लावत स्वतंत्र भूमिका देखील घेतली होती.
 

Edited by-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live