कोरोना काळात संपूर्ण फी भरण्यास पालकांचा विरोध

सागर आव्हाड
गुरुवार, 13 मे 2021

पुणे : कोरोना Corona  संकट सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत शैक्षणिक Educational Sector क्षेत्रावर फार मोठे परिणाम झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून शिक्षण पद्धती ऑनलाईन Online Education झाली आहे. या काळात गेल्या वर्षभरापासून शाळकरी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. Parents oppose paying the full fee during the Corona period

चालू शैक्षणिक वर्ष देखील ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणार असल्याचे दिसत आहे. सर्व काही ऑनलाईन असताना शाळा मात्र साधारण परिस्थिती प्रमाणेच पूर्ण फी मागत आहे. यावर्षी आम्ही पूर्ण फी Full Fees देऊ शकत नाही त्यामुळे शाळेने या वर्षासाठी ५० टक्केच फी घ्यावी अशी मागणी आता पालक करू लागले आहेत. 
 
ऑर्चिड शाळेच्या Orchid School विरोधात पोस्टर घेऊन पालकांकडून मूकपद्धतीने आंदोलन करण्यात आले. कोविड काळात शाळेने यावर्षी ५० टक्केच फी घ्यावी यावर्षी शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु असून देखील शाळेसाठी १ लाख फी का द्यावी असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. Parents oppose paying the full fee during the Corona period

राज्यातल्या लाॅकडाऊनची नियमावली मुख्यमंत्री दोन दिवसांत जाहीर करणार

 

जेवढे महत्वाचे विषय आहेत तेवढेच ऑनलाइन शिकवा ऑनलाइन मुळे मुलांची चिडचिड वाढली आहे. या कठीण काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अश्या वेळी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पालकांसमोर आहे. संपूर्ण फी बाबत शाळा समोर येऊन काहीही बोलत नाही त्यामुळे आम्ही विचारणा कुठे करायची असा प्रश्न पालक उपस्थित करत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe  


संबंधित बातम्या

Saam TV Live