भारताचा ‘या’ भागात स्वर्गाची अनुभूती, बर्फवृष्टीमुळे निसर्ग आणखी खुलला

भारताचा ‘या’ भागात स्वर्गाची अनुभूती, बर्फवृष्टीमुळे निसर्ग आणखी खुलला


श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे. दरम्यान, हिमवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात लष्कराच्या दोन पोर्टरचा समावेश आहे. 

काल रात्रीपासून काश्‍मीर खोऱ्यात बहुतांश भागांत हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिणामी गुरेज, माच्छिल, केरान आणि तंगधारसारख्या दुर्गम भागाशी संपर्क साधणारे रस्ते बंद करण्यात आले. यासह विविध मार्गांवर सुमारे दोन हजारांहून वाहने अडकली. हिमवृष्टीमुळे यंदाच्या हंगामातील पहिले किमान तापमान नोंदले गेले. हिमवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर विजेच्या ताराही तुटल्या. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्‍बाल चौधरी यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरचा बर्फ काढण्यासाठी ४५ मशिनचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले. 


हिमवृष्टीमुळे विविध दुर्घटना होऊन चौघांचा मृत्यू झाला. कुपवाडा येथे दरड कोसळून लष्करातील पोर्टर इसाक खान यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत हिमवृष्टी झाल्याने विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करत असताना विजेचा धक्का बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहरातील हबाक भागात अंगावर झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. 

हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरून बर्फ हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे

WebTittle:: In this part of India, the feeling of heaven, the snow, makes nature more open


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com