IPL 2021: 15 कोटींचा कमिंन्स म्हणतो मी आता खेळणार नाही 

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 30 मे 2021

एखाद्या खेळाडूला एवढ्या महागड्या किमतीत विकत घ्यायचा आणि तोच खेळायला नकार देतो?

पुढे ढकलण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धा यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये (UAE) होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलमध्ये अजून 31 सामने होणार आहेत. परंतु, सर्व संघाना आणि संघ मालकांना ज्यांची भीती होती, ती गोष्ट घडायला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मुख्य गोलंदाज पॅट कमिंन्सने ( Pat Cummins) सांगितले आहे की तो उर्वरित आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. आता भीती या गोष्टीची आहे की आगामी टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) लक्षात घेता विविध देशातील खेळाडू आयपीएल खेळणार का? हा प्रश्न संघ कमिटीला पडलेला आहे. ऑस्ट्रेलियातील एका माध्यमाच्या अहवालानुसार,  पॅट कमिन्सने हे स्पष्ट केले आहे की तो आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये (आयपीएल 2021) सहभागी होणार नाही. तथापि, कमिंन्सने यामागे कोणतेही ठोस कारण दिले नाही.

IPL चे सप्टेंबरमध्ये कमबॅक, बीसीसीआयची घोषणा

या वृत्तानुसार, कौटुंबिक कारणांमुळे डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांना विंडीज दौर्‍यावरुन विश्रांती देण्यात येईल. त्याच वेळी, इतर काही खेळाडू विश्रांतीची घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर, महागडा खेळाडू पॅट कमिंन्सने स्पष्ट केले आहे की उर्वरित आयपीतील खेळणार नाही. तथापि, कमिंन्ससच्या  निर्णयाबाबत बीसीसीसीआय आणि केकेआरचे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निर्णयानंतर हिरो ठरलेला कमिंन्स असा निर्णय घेणं अशक्य आहे असे  क्रिकेटचे चाहते म्हणत आहेत.(Pat Cummins will not play the rest of the IPL)

अमेरिकेहून Amphotericin B चे 2 लाख डोस भारतात आले

त्याचबरोबर, एखाद्या खेळाडूला एवढ्या महागड्या किमतीत विकत घ्यायचा आणि तोच खेळायला नकार देतो? हे अनुचित मानले जाईल किंवा त्याला मिळणाऱ्या रकमेतून काही रक्कम वजा केली जाईल. युएईमध्ये होणाऱ्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआय 25 दिवसांची विंडो शोधत आहे. दरम्यान, पॅट कमिंन्सला केकेआरने 15 कोटी 50 लाख रुपयाला विकत घेतले होते. 

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा 


संबंधित बातम्या

Saam TV Live