VIDEO | रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधामुळे पतंजलीची बक्कळ कमाई

साम टीव्ही
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

आता बातमी रामदेव बाबांच्या पतंजलीची. कोरोनावर औषध म्हणून लॉन्च केलेल्या आणि नंतर फक्त रोग प्रतिकार शक्तीचं औषध असल्याच्या स्पष्टीकरणानंतरही कोरोनिलने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केलाय. कोटीच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्या कोरोनिलनं कसा केलाय विक्रमी व्यवसाय. पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असतानाच रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने बक्कळ कमाई केलीय. कोरोनावरचं औषध म्हणून कोरोनिल लॉन्च करण्यात आलं मात्र, त्यावरून अनेक वाद झाले. त्यानंतर पतंजलीने कोरोनिल कोरोनावरचं औषध नसून रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उयुक्त असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. याच वादाच्या गर्तेत अडकूनही कोरोनिलच्या माध्यमातून पतंजलीने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केलाय.

पतंजलीच्या कोरोनिल औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री झालीय. अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 241 कोटी रुपयांचा व्यवसाय पतंजलीने केलाय. महत्त्वाचं म्हणजे कोरोनिल औषधाचे तब्बल 85 लाखांहून अधिक किट विकले गेले आहेत. 
 
कोरोनाच्या संकटात रोग प्रतिकारशक्ची वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. आहारात बदलही केले गेले. त्यामुळेच, वादात सापडूनही कोरोनिलची विक्रमी विक्री झालीय. त्यामुळे, योग साधना शिकवणाऱ्या रामदेवबाबांनी साधलेला यशस्वी व्यवसायाचा बाजारयोग चर्चेचा विषय ठरलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live