गोंदियातील धक्कादायक प्रकार, कोविड सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 4 मे 2021

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना, बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. मुर्री येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. 

 

गोंदिया : कोरोनाचा  Corona वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना, बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. मुर्री Murray येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. Patient escapes from Covid Center in Gondia 

हे देखील पहा - 

या पद्धतीने वर्तन राहिल्यास जिल्ह्यात संसर्ग आणखी वाढेल. त्यामुळे पळून गेलेल्या रुग्णांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरामधील मुर्री येथील कोविड Covid केअर सेंटरमध्ये एका कोरोनाबाधिताला दाखल केले होते. मात्र, त्याने कुणाला माहिती न देता कोविड सेंटरमधून पळ काढला आहे. 

जिद्दीच्या जोरावर 98 वर्षेच्या आजींने केली कोरोनावर मात

त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यामुळे इतरांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यावरून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये पळून गेलेल्या बाधिता विरोधात गोंदिया शहर पोलिसांनी Police गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोध पोलीस घेत आहे.

Edited By- Digambar Jadhav 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live