धक्कादायक! कोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप

साम टीव्ही
शुक्रवार, 12 जून 2020
  • कोरोनाचे खोटे अहवाल दिल्याने रुग्णांना मनस्ताप
  • थायरोकेअर लॅबवर कारवाईची मागणी
  • कोरोनाच्या आडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा?

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात कुठल्याही रुग्णाला दाखल कऱण्यापुर्वी त्याची कोरोना चाचणी केली जाते. मात्र कोरोनाबाबतच्या चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णांना हकनाक त्रास सहन करावा लागतोय.

कल्याणनजीक असलेल्या शहाड परिसरात राहणारे हे शरद पाटील..घरात पडल्याने त्यांचा हात फ्रक्चर झाला. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी शासनाच्या नियमानुसार त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आणि या टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांच्या घरात आणि परिसरात जंतुनाशक फवारणी करत संपूर्ण सोसायटी सील केली. मात्र आपला अहवाल चुकीच्या असल्याच्या संशयातून पाटील यांनी पुन्हा वेगळ्या लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली. आणि त्यांचा संशय खरा ठरला..कारण दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. 
दरम्यान आपल्याला झालेला मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंडामुळे व्यथित झालेल्या पाटील कुटुंबाने संबंधित लॅबवर कारवाईची मागणी केलीय. 
गंभीर बाब म्हणजे अशा खासगी लॅबमधून दररोज महापालिकेला किमान दहा बारा रुग्णांचे पॉजिटिव्ह अहवाल प्राप्त होताय. त्यामुळे हे कोरोनाच्या आडून पैसा उकळण्याचं एखादं रॅकेट तर नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live