रुग्णालयाचं बील ऐकून त्यांनी थेट पिस्तुलच काढलं!

सूरज सावंत
गुरुवार, 27 मे 2021

रुग्णालयाचं बिल इतके झालं हे सांगताच पारा चढलेल्या रुग्णाच्या घरातल्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर थेट पिस्तुल ताणल्याचा प्रकार चारकोप परिसरात घडला आहे

मुंबई : रुग्णालयाचं Hospital बिल इतके झालं हे सांगताच पारा चढलेल्या रुग्णाच्या घरातल्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर थेट पिस्तुल Pistol ताणल्याचा प्रकार चारकोप Charkop परिसरात घडला आहे. Patients relative pulled out Pistol after listening hospital bill Amount 

वृद्ध महिलेच्या मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाने जादा बिल लावल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप होता.  या प्रकरणी चारकोप परिसरात तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस Police या तिघांचा शोध घेत आहेत. 

हे देखिल पहा

चारकोपच्या महावीर नगर परिसरात पार्वतीबाई चव्हाण रुग्णालयामध्ये निकुंज पताडीया यांनी त्यांची वृद्ध आजीला रुग्णाला दाखल केले होते. त्यांच्या रुग्णावर रुग्णालय प्रशासनाकडून उपचार सुरू असताना वृद्ध आजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Patients relative pulled out Pistol after listening hospital bill Amount 

आमदार अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थला अटक

उपचारा दरम्यान झालेल्या अडीच लाखाच्या बिलाची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे कर्मचारी प्रशांत खैरे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनादिली. त्यावर संतापलेल्या   निकुंज पताडीय, घनश्याम पताडीय आणि किसन करोडिया यांना  राग अनावर झाल्याने तिघांनी प्रशांत यांच्याशी बिल वाढवून लावल्याचे आरोप करत  वाद घातला. 

हा वाद इतका विकोपाला गेला की, यातील आरोपींनी खैरे यांना मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता यातील आरोपी घनश्याम पताडीय यांनी ज्याच्याजवळ असलेली पिस्तुल खैरेंवर रोखून  धरत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. Patients relative pulled out Pistol after listening hospital bill Amount 

तसेच आरोपीं रुग्णालयातील खुर्चा, टेबल, दरवाजा तोडून निघून गेले. या घटनेची माहिती खैरे यांनी पोलिस नियंञण कक्षाला  दिल्यानंतर  चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live