पिंपरीच्या नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना अटक

गोपाळ मोटघरे
रविवार, 30 मे 2021

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या एका नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना पुणे मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या एका नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना पुणे मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. PCMC Corporator Arrested For Gambling

प्रसाद शंकर शेट्टी अस अटक करण्यात आलेल्या नगरसेवकांच नाव आहे. मार्केट यार्ड परिसरातील विपुल या बंगल्यात जुगार खेळताना अटक प्रसाद शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. प्रसाद शेट्टी सोबत आणि अन्य 18 आरोपींना देखिल मार्केट यार्ड पोलिसांनी जुगार खेळतांना अटक केली आहे.

कोविड केंद्राच्या स्वच्छतागृहाची शाळकरी मुलाकडून सफाई

अटक करण्यात आलेल्या आरोपी कडून मार्केट यार्ड पोलिसांनी 53 हजार 900 रुपये रोख रक्कम आणि  एक लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. PCMC Corporator Arrested For Gambling

हे देखिल पहा

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live