Breaking पिंपरीच्या नगरसेविकेच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

गोपाळ मोटघरे
सोमवार, 29 मार्च 2021

चिंचवड येथिल भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे  यांचा मुलगा प्रसन्न चिंचवडे याने काल रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकारामुळे पिंपरीच्या राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी : चिंचवड येथिल भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे  यांचा मुलगा प्रसन्न चिंचवडे याने काल रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकारामुळे पिंपरीच्या राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. PCMC Corporator Son Committed Suicide

प्रसन्नने  आपल्या वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे. प्रसन्नने काल रात्री आपल्या राहत्या घरातील खोली मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मात्र, प्रसन्नने आत्महत्या का केली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live