आयर्नमॅन पोलिस आयुक्तांची चक्क सायकलीवरुन गस्त

PCMC police Commissioner Visited Police Station riding Bicyle
PCMC police Commissioner Visited Police Station riding Bicyle

तळेगाव स्टेशन : पिंपरी चिंचवडचे Pimpri Chinhwad पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश शुक्रवारी (ता.०९) मध्यरात्रीनंतर तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याला थेट चिंचवडहून सायकलींग करत भेट देऊन सार्वजनिक सुरक्षसव्यवस्थेचा आढावा घेतला. पहाटे सव्वातीनच्या सुमारास अचानक चक्क स्पोर्ट्स Sports सुटमधे सायकलवर Bicyle अवतरलेल्या या आयर्नमॅनला Iron man पाहून रात्रगस्तीवरील ग्रामसुरक्षादलासह पोलीस अधिकारी,कर्मचारी देखील चकित झाले. PCMC Ironman Police commissioner Krishnprkash Visited Police station riding Bicycle 

अभ्यासू,करारी बाणा,कुठल्याही दबावाला बळी न पडता व्यक्त होणारी बेधडक आणि सडेतोड वृत्ती तसेच प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश Krishnprakash यांची ओळख आहे.पोलीस दलातील फिटनेसचा सिम्बॉल म्हणून ख्याती पावलेल्या कृष्णप्रकाश यांनी विकेंड लाॅकडाऊनच्या Lock Down पार्श्वभूमीवर कुठलीही पूर्वसूचना न देता पोलीस Police आयुक्तलयापासून जवळपास तीस किलोमीटरवर असलेल्या तळेगाव दाभाडे Talegaon Dabhade आणि  तळेगाव एमआयडीसी MIDC पोलीस ठाण्याला शनिवारी (ता.१०) पहाटे  सायकलवर धावती भेट दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात आढावा घेऊन ते पुढे चाकणच्या Chakan दिशेने सायकलवर रवाना झाले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी आयुक्त कृष्णप्रकाश यांना लाॅकडाउन आणि तळेगाव दाभाडे परिसरात लोकसहभागातून ग्रामसुरक्षा दलाच्या सहकार्याने प्रभाविपणे चालू असलेल्या रात्रगस्तीबद्दल माहिती दिली. 

दीड महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या स्वयंसेवकांना लाठी,शिट्टी आणि ओळखपत्र प्रदान कार्यक्रमात तळेगाव पॅटर्न यशस्वी होणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला होता. तळेगावच्या या सायकलस्वारी दरम्यान चाकण मार्गावरील मराठा क्रांती चौकात ग्रामसुरक्षा दलाच्या स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या जागृकतेबद्दल कौतुक आणि समाधान व्यक्त करत लोकसहभागातून ग्रामसुरक्षेचा तळेगाव पॅटर्न यशश्वी झाल्याची पोचपावती आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यावेळी  स्वयंसेवकांना दिली. PCMC Ironman Police commissioner Krishnprkash Visited Police station riding Bicycle 

गणवेशाविना,डोक्यात हेल्मेट नीळपांढरा ट्रॅक सूट आणि काळी स्पोर्ट्स थ्री फोर्थ पॅन्ट,पायात मोजे आणि पांढरे शुभ्र स्पोर्ट्स शूज अशा अवतारात अनपेक्षितपणे सायकलवर प्रकटलेल्या आयर्नमॅनच्या या स्पोर्टी लूकने प्रभावित झालेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या स्वयंसेवकांना सेल्फीचा मोह आवारता आला नाही.आयुक्तलयापासून दूर ग्रामीण भागातील तळेगाव परिसरात इतक्या मध्यरात्री सायकलवर भेट देणारे कृष्णप्रकाश हे पहिलेच पोलीस आयुक्त ठरल्याने शनिवारी त्यांची ही सायकलस्वारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
Edited By - Amit Golwalkar


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com