औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली पिंपळाची पाने: 'या' आजारांपासून होऊ शकते त्वरित सुटका 

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 18 मे 2021

हिंदू धर्मात पिंपळाचे झाड शुभ मानले जाते. या झाडाची पूजा केल्यास पापांची समाप्ती होते आणि माता लक्ष्मीची कृपा होते असे मानले जाते. आयुर्वेदातही या झाडाला औषध मानतात. आणि या झाडाची पाने अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी देखील वापरली जातात. पिंपळाची पाने त्वचेसाठी चांगली असतात आणि त्वचा उजळून होण्यास फायदेशीर असतात.

हिंदू धर्मात पिंपळाचे झाड Peepal tree शुभ मानले जाते. या झाडाची पूजा केल्यास पापांची समाप्ती होते आणि माता लक्ष्मीची कृपा होते असे मानले जाते. आयुर्वेदातही Ayurved या झाडाला औषध मानतात. आणि या झाडाची पाने अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी देखील वापरली जातात. पिंपळाची पाने त्वचेसाठी चांगली असतात. Peepal leaves perfect for medicinal properties

डोळ्यांच्या जळजळीसाठी प्रभावी
पिंपळाची पाने डोळ्यांसाठी Eyes प्रभावी आहेत. त्यांचा उपयोग केल्याने डोळ्यांची जळजळ आणि वेदनांचे त्रास दूर होतात. डोळ्यांना त्रास होत असेल तर पिंपळाची पाने दुधात मिसळा आणि हे दूध प्या. याशिवाय डोळ्यावर पिंपळाची पाने लावणे देखील प्रभावी आहे. आणि पेस्ट देखील लावल्यास डोळ्यांना थंडपणा मिळतो. म्हणून, ज्या लोकांना डोळ्यांची जळजळ आहे. ते लोक ही पेस्ट डोळ्यावर लावू शकतात.

हे देखील पहा -

दम्याच्या समस्येपासून मुक्तता
दम्याचा Asthma त्रास असलेल्या लोकांनी पिंपळाच्या पानांचे सेवन करावे. पिंपळाची पाने खाल्यास दम्यापासून आराम मिळतो. काही  पिंपळाची पाने सुकवा. यानंतर त्यांना बारीक करा आणि पावडर तयार करा. त्यांनंतर ही पावडर दुधात उकळा आणि प्या. वाटल्यास या दुधामध्ये आपण मध किंवा साखर देखील घालू शकता. दिवसातून दोनदा हे प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होईल.

पोटदुखीपासून मुक्तता
ही पाने पोटदुखीच्या Stomach तक्रारी दूर करतात. पिंपळाच्या पानांना पाण्यात उकळवावे आणि पोट दुखत असेल तर हे पाणी प्या. या व्यतिरिक्त, जर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये वेदना आणि सूज येत असेल तर आपण त्या जागेवर पिंपळाच्या पानांची पेस्ट लावावी. तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. 

खतांच्या भाववाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

दातदुखी पासून आराम 
काही लोकांना दात Teeth दुखण्याची तक्रार असते. दातदुखी असल्यास पिंपळचे स्टेम वापरा. पिंपळाचे स्टेमद्वारे दररोज दोनदा दात स्वच्छ करा. याशिवाय आपण  पिंपळचे  कच्चे मूळ देखील वापरू शकता. 

फाटलेल्या टाचा होतील मुलायम 
फाटलेल्या मुरुडांच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी पिंपळचे पाने देखील प्रभावी आहेत. टाचा फुटल्या की त्यावर पिंपळाची पाने लावा. हे लावल्यास फाटलेल्या टाचा दुरुस्त होतील. 

ताप बरा होण्यास फायदेशीर 
पिंपळाची पाने ताप Fever काढून टाकण्यासही फायदेशीर ठरतात. जास्त ताप आल्यास, पिंपळाची पाने दुधासह प्या. ताप कमी होईल. काही पिंपळाची पाने घ्या आणि स्वच्छ करा. त्यानंतर गॅसवर एक ग्लास दूध Milk गरम करण्यासाठी ठेवा. या दुधात स्वच्छ केलेली पाने टाका. आणि हे दूध उकळवून प्या. 

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live