कडक लॉकडाऊनमध्ये परळी शहरात भरला फळबाजार

Corona Rules flouted in Beed District
Corona Rules flouted in Beed District

परळी : बीड जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने, जिल्ह्यातील प्रशासन हतबल झालं आहे. आज रुग्णांना बेड  ,रेमडेसीवीर,ऑक्सिजन मिळणं कठीण झालंय.तर हा वाढता समूह संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडक लॉकडाऊन लागू केलेला आहे. people Flouting Corona Rules in Parali Fruit Market

मात्र याला परळीकर गांभीर्याने घेत नसल्याच बोलकं चित्र शहरातील राठोड मेडिकल लगत दिसून आलं. परळी शहरातील या मेडिकल लगत कोरोनाच्या नियमांना हरताळ फासत, कडक लॉकडाऊन मध्ये देखील, सकाळी फळबाजार सुरू केला होता.

हे देखिल पहा

यावेळी दुकानदारांनी खुलेआमपणे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून, आंब्यांसह इतर फळांची, नागरिकांची गर्दी जमवून पुकारा करून विक्री केली. विशेष म्हणजे हा फळ बाजार रोज भरत आहे.आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील रोजचं जमत आहे. people Flouting Corona Rules in Parali Fruit Market

असे असताना प्रशासनाकडून नागरिकांना नियम पाळणे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येतंय. मात्र ही गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाची भीती राहिली नाही का.? असाच प्रश्न पडला आहे. त्यामुळे परळीतील ही गर्दी उद्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या समूहसंसर्गाला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे....!

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com