कान्हेरीत लोकवर्गणीतून उभारले रुग्णालय.. 

विश्वभूषण लिमये
सोमवार, 7 जून 2021

कान्हेरी गावातील ग्रामस्थांनी "गाव करी ते राव काय करी" ही म्हण सार्थकी लावत लोकवर्गणीच्या स्वरूपातून गावात अद्यावत रुग्णालय ऊभं केलं आहे.

वृत्तसंस्था :  सोलापूर जिल्ह्यातील कान्हेरी Kanheri या गावात "लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य चळवळ" या योजनेतून अद्ययावत रुग्णालय उभे केले आहे. यात विशेष बाब म्हणजे या गावात आतापर्यंत एकही अद्यावत सेवा देणारं रुग्णालय Hospital नव्हत. मात्र  कान्हेरी गावातील ग्रामस्थांनी "गाव करी ते राव काय करी" ही म्हण सार्थकी लावत लोकवर्गणीच्या स्वरूपातून गावात अद्यावत रुग्णालय ऊभं केलं आहे. (The people of Kanheri built the hospital at their own expense)

कान्हेरीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कान्हेरी नवनिर्माण संघाने पुढाकार घेत, या रुग्णालयाची उभारणी केली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने  250 रुपये वार्षिक देणगी या रुग्णालयासाठी दिलेली आहे. 

आजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद!

गावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी ठराविक वर्गणी संकलित करून 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे हॉस्पिटल चोवीस तास 24 तासांसाठी नागरिकांना सेवा देत आहे. नुकतंच सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या रुग्णालयाच 'लोकार्पण' केलं आहे. The people of Kanheri built the hospital at their own expense

हे देखील पहा 

"लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य चळवळ" हे ब्रीद उराशी बाळगून चॅरिटेबल Charitable हॉस्पिटल आपलं काम नित्याने पार पाडत आहे. या हॉस्पिटलच काम हे इतर गावांसाठी एक आदर्श उदाहरण ठरलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live