दारुच्या घोटासाठी भर उन्हात अर्धा किलोमीटरच्या रांगा

विनोद जिरे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

बीडच्या Beed माजलगावमध्ये बंदी असतानाही, दारू घेण्यासाठी नागरिकांनी वाईन शॉपच्या दुकानासमोर, तब्बल अर्धा किलोमीटर लांब रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.

माजलगाव : बीडच्या Beed माजलगावमध्ये बंदी असतानाही, दारू घेण्यासाठी नागरिकांनी वाईन शॉपच्या दुकानासमोर, तब्बल अर्धा किलोमीटर लांब रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाईनशॉपवरून Wine Shop दारूदेण्यास बंदी आहे. मात्र बीडसह माजलगावमध्ये खुलेआम दारू विक्री होत आहे. People queuing in front of Wine shop in Beed District Majalgaon 

तर ही दारू घेण्यासाठी माजलगावमधील शिवाजी महाराज चौकातील Shivaji Maharaj Chowk वाईनशॉपसमोर नागरिकांनी अर्धा किलोमीटर लांब रांगा लावल्या होत्या.बीड जिल्ह्यासह राज्यात वाईन शॉपवरून केवळ होम डीलेव्हरीला Home Delivery परवानगी आहे. ग्राहकांना शटर उघडून दारू देण्यावर बंदी आहे.मात्र कोरोनाला निमंत्रण देत ही खुलेआम दारू विक्री होत आहे. 

एकीकडं कोरोना Corona रोखणं प्रशासनासमोर आव्हान निर्माण झालं असतांना दुसरीकडं दारूसाठी लागणाऱ्या रांगा कोरोनाला निमंत्रण देत आहेत. मात्र तरीही प्रशासनाकडून याकडं फक्त बघ्याची भूमिका घेतली जात असून प्रशासन आता तरी यावर कारवाई करणार का ? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय....!
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live