कोरोना निर्बंध तुमच्यासाठी नाहीत का ओ ? (पहा व्हिडीओ)

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागूनही मुंबईतील दादर मार्केटमध्ये गर्दी काही केल्या कमी होत नाही आहे. भाजी मार्केट मध्ये लोक बाहेर पडलेली पाहायला मिळत आहेत. नागरिकांना आवाहन केल्यानंतरही बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. 

मुंबई: कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहे असे असले तरी मुंबईतील Mumbai दादर Dadar मार्केटमध्ये गर्दी Crowd काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. दादरच्या भाजी मार्केटमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहेत. नागरिकांना आवाहन केल्यानंतरही बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या गर्दीकडे पोलिसांसह Police पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Peoples are not following corona rules in Dadar bhaji market 

 

सुरक्षित अंतर आणि मास्क नियमावलीचे बाजारात पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गर्दीमध्ये खबरदारीचे नियम पाळले जात नसल्याचेही चित्र आहे. यामुळे कोरोना रुग्ण वाढीला निमंत्रण मिळत आहे. दादर फुल बाजार आणि भाजी मार्केट एकाच ठिकाणी आहे आणि लोकांची येथे खरेदीसाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्केट कधी हलवणार किंवा  गर्दी करणाऱ्यांवर कसा चाप लावणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात कठोर निर्बंध Restrictions लागू आहेत. ते या लोकांसाठी नाहीत का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठीच निर्बंध लावले जातात तरीही लोक मात्र गर्दी करत आहेत असे भयाण गर्दीचे दृश्य पाहायला मिळत आहे.

मुंबईत कोरोना संक्रमणाचे प्रमाण जरी कमी होत असले, तरी अद्याप  कोरोना पूर्ण संपलेला नाही. दादरच्या भाजी मार्केट मध्ये कुठलाही प्रकारच सोशल डिस्टंसिंग Social Distancing नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. तर अनेकांच्या तोंडाला मास्क सुद्धा नाही. पोलीस प्रशासन येथे असून देखील नियमावलीचे Rules पालन  केले जात नाही. किंवा कोणतीही कारवाई केलेली पाहायला मिळत नाही. तेथील वॉर्ड अधिकाऱ्यांना याची कोणतीही कल्पना आहे की नाही असा प्रश्न हा नजारा पाहिल्यावर उपस्थित होतो. या ठिकाणी कोरोना पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत नाही. आजच्या घडीला मुंबईमध्ये औषधांचा, लसीचा तुटवडा सुरू असताना येथे अशी गर्दी पाहायला मिळते म्हणजे कोरोनाला समोरून आमंत्रण दिल्यासारखेच आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live