BREAKING | राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, वाचा काय असतील अटी...

साम टीव्ही
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020
  • राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी
  • विशेष 200 गाड्यांतून प्रवास करता येणार
  • ई-पासची अट रद्द केल्यानंतर रेल्वेचा निर्णय
  • कोणतीही नवीन रेल्वे सुरु होणार नाही

महाराष्ट्रामध्ये राज्याअंतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. ज्या स्पेशल एक्सप्रेस सुरु आहेत त्यामधून राज्यांतर्गत प्रवास करता येणार आहे. कोणतीही नवीन ट्रेन सुरु होणार नाहीये.  ज्या 200 विशेष गाड्या सुरु आहेत. त्यातूनच केवळ प्रवास करता येईल. मध्य रेल्वेने उद्यापासून या 200 गाड्यांसाठीचं बुकिंग सुरु केलंय.

 राज्य सरकारने ई-पासची अट रद्द केल्यानंतर मध्य रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.  हा निर्णय  झाला असला, तरीही रेल्वे वाहतूक अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु नाही.

 पाहा सविस्तर - 


संबंधित बातम्या

Saam TV Live