येत्या 5 तारखेपासून 'या' गोष्टींना परवानगी, वाचा मुख्यमंत्र्यांनी काय केल्यात घोषणा?

साम टीव्ही
रविवार, 31 मे 2020
 1. लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात फेका
 2. 3 जूनपासून घराबाहेर व्यायामाला परवानगी
 3. 8 जूनपासून मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यालयं उघडणार
 4. 5 जूनपासून दुकानं सम-विषम पद्धतीने उघडणार
 5. रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्याची परवानगी
 6. राज्यात लॅबची संख्या वाढवणार

ओम: हा नारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. हळूहळू आपण सगळं काही सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, पण गर्दीला संमती दिली नाही, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. कार्यालय सुरु करण्यासंबंधी भाष्य करताना दुकान उघडण्यासाठी नवा फॉर्म्युलाही त्यांनी जाहिर केलाय. महाराष्ट्रात चाचणी केंद्रांसह चाचण्यांची संख्याही वाढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, शैक्षणिक वर्ष आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत त्यांनी महत्त्वाची घोषणा केलीय. 

UNCUT THACKERAY | 'लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात फेका'',पाहा, येत्या 5 तारखेपासून काय काय सुरु? 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या महत्वाच्या घोषणा - 

 1. लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात फेका
 2. 3 जूनपासून घराबाहेर व्यायामाला परवानगी
 3. 8 जूनपासून मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यालयं उघडणार
 4. 5 जूनपासून दुकानं सम-विषम पद्धतीने उघडणार
 5. रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्याची परवानगी
 6. राज्यात लॅबची संख्या वाढवणार
 7. 4 दिवस मच्छिमारांनी बंदरात जाऊ नये, कारण वादळाचा मोठा धोका आहे.
 8. आतापर्यंत राज्यात 28 हजार रुग्ण बरे झालेत. केवळ 200 रुग्ण व्हेंटिलेटरवर, 
 9. अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द, अंतिम वर्षाचे गुण सरासरीतून देणार.
 10. शाळा नाही पण शिक्षण सुरू ठेवणार, इ-लर्निंगचा वापर करणार.
 11. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची सवय लावा
 12. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींनी घरातच राहा..

संबंधित बातम्या

Saam TV Live