suicide
suicide

पोलिसांच्या जाचाला कंटाळून इसमाने केला आत्महत्येचा प्रयत्न...

बुलढाणा - उपोषणाला बसलेल्या व्यक्तीचे उपोषण उधळून त्याला पोलीस Police अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने या इसमाने पोलिसांच्या त्रासाला police harassment कंटाळून विषारी औषध Toxic drug घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप या इसमाच्या भावाने केला आहे. या इसमावर बुलडाणा Buldhana जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. person tried to commit suicide due to police harassment

चिखली तालुक्यातील अमडापूर येथील शाम राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीवर कारवाई झाली नसल्याने त्यांनी पोलिसांना विचारपूस केली असता त्यांना पोलीस ठाण्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.

त्याची तक्रार त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आणि या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणी साठी उपोषण सुरू केले असता पोलिसांनी दमदाटी करून हे उपोषण उधळून लावले आणि शाम राऊत यांना ठाणेदारासह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासह कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिंतेत पडलेल्या शाम राऊत यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांचा भाऊ गजानन राऊत यांनी दिली आहे. person tried to commit suicide due to police harassment

तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करून शाम राऊत यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या बिट बदलण्यात आल्या आहेत व आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौकशी करून जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

ठाणेदार अमित वानखेडे यांचे काही घरगुती अडचणी असल्याने त्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज दिला होता त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली असून अमडापूर ठाणेदार पदाचा प्रभारी पदभार एलसीबीचे एपीआय नागेश चतरकर यांना देण्यात आला असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com