पेट्रोल, डिझेल उत्पादन शुल्कात वाढ!

साम टीव्ही
शनिवार, 14 मार्च 2020
  • केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 
  • या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
  • सर्वसामान्यांच्या संतापात आणखीच भर पडत आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेल उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रतिलिटर 3 रुपये एवढी असून, यामुळे लवकरच देशात पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकीकडे जगभरात कोरोना, तसंच रशिया-ओपेकमधील वादामुळे प्रतिबॅरल कच्च्या तेलाचे दर घसरत असताना देशात मात्र इंधन दरवाढ कायम असल्याने सर्वसामान्यांच्या संतापात आणखीच भर पडत आहे. इंधनाचे दर वाढणार असल्यानं वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

हे ही वाचा - मास्क वाढवतोय कोरोनाचा धोका

हे ही वाचा - 'कोरोनामागे अमेरिकेच्या सैन्याचा हात?'

हे ही वाचा - Coronavirus | पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोना!

हे ही वाचा - शेअर बाजार: लोअर सर्किट म्हणजे काय?

हे ही वाचा - वर्ल्ड किडनी डे! किडनीची काळजी घ्या


संबंधित बातम्या

Saam TV Live