देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालीय.

saam tv
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालीय.. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली..  या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95 रुपये 19 पैशांवर पोहोचले... तर प्रतिलिटर डिझेलसाठी 86 रुपये 2 पैसे मोजावे लागतायत...

 

देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालीय.पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली..  या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95 रुपये 19 पैशांवर पोहोचले.तर प्रतिलिटर डिझेलसाठी 86 रुपये 2 पैसे मोजावे लागतायत. पेट्रोलच्या डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरु राहिली, तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठण्याची चिन्हं आहेत.गेल्या 10 महिन्यात कोरोना काळात केंद्र शासनाने पेट्रोलचे भाव 18 रुपये 88 पैशांनी.तर डिझेलचे दर 19 रुपये 50 पैशांनी वाढले... भारतात पेट्रोल आणि डिझेलवरील कर हा सर्वाधिक आहे. आजच्या घडीला इंधनावरील कर भरून ग्राहकांचे कंबरडे मोडलेय.. मात्र सध्याच्या स्थितीत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचा खिसा रिकामा होतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीतही वाढ होताना दिसतेय.

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३६ पैशांनी महागले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने ६२ डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. एकीकडे कंपन्यांची जोरदार कमाई सुरु असून ग्राहकांची मात्र लूट सुरु असल्याचे बोलले जाते.

आठवडाभरात सलग पाचव्या दिवशी इंधन महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर चेन्नईत ९१ रुपयेआणि बंगळुरुत ९२ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.

भाजपसाशित या राज्याचा मोठा निर्णय ; पेट्रोल-डिझेल झालं पाच रुपयांनी स्वस्त
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.९३ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.७० रुपये मोजावे लागतील. राज्यात नांदेडमध्ये ९६.८७ रुपये आहे. शुक्रवारी येथे पेट्रोल ९८.०७ रुपये झाले होते. तर परभणीमध्ये सर्वाधिक ९७.०६ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.४५ रुपये आहे.

'गोल्ड ईटीएफ'झळाळले ; 'या' कारणांमुळे वाढलयं 'गोल्ड ईटीएफ'चे आकर्षण
दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.७४ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.७० रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.९६ रुपये भाव आहे.कोलकात्यात आज पेट्रोल ८९.७३ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.३३ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९१.४० रुपये असून डिझेल ८३.४३ रुपये झाला आहे.

सरकारी कंपनीत गुंतवणूक संधी ; जाणून घ्या रेलटेल कॉर्पोरेशनच्या 'आयपीओ'बाबत
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ६२.४३ डॉलर असून त्यात १.२९ डॉलरची वाढ झाली. तर लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव १.२३ डॉलरने वधारला आणि ५९.४७ डॉलर झाला.
 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live