दरवाढीचा झटका; पेट्रोल-डिझेल परत महागले... 

Petrol diesel prices go up again
Petrol diesel prices go up again

मुंबई : एक दिवसानंतर परत पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल Petrol व डिझेल Diesel दरवाढ Rate केली आहे. देशभरात पेट्रोल २५ पैसे तर, डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. Petrol-diesel prices go up again

या दरवाढीनंतर मुंबईत Mumbai १ लीटर पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये झाला आहे. चेन्नईत Chennai पेट्रोल ९६.९४ रुपये भाव आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.५६ रुपये झाले आहे. तर कोलकता मध्ये १ लीटर पेट्रोल ९५.५२ रुपये झाले आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर Assembly elections कंपन्यांनी इंधन दरवाढी लावलीच आहे. आजपर्यंत २२ वेळा कंपन्यांनी इंधन दरवाढ केली आहे. यामध्ये डिझेल दरात एकूण ५.६९ रुपयांची दर वाढ झाली आहे. तर पेट्रोल ५.२४ रुपयांनी दर महागले आहे. पेट्रोलने जवळपास सहा राज्यांमध्ये शंभरी गाठली आहे. डिझेल सुद्धा त्या मार्गाने वाटचाल चालू झाली आहे. गेल्या महिनाभरात इंधन दरवाढीत पेट्रोलच्या तुलनेत डिझेल अधिक महाग झाले आहे. Petrol-diesel prices go up again 

मुंबईत डिझेलचा भाव ९३.८५ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८६.४७ रुपये इतके दर आहे. चेन्नई मध्ये ९१.१५ रुपये आणि कोलकात्यात Kolkata ८९.३२ रुपये डिझेलचा भाव झाला आहे. राजस्थानातील Rajasthan श्री गंगानगर येथे, देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे. डिझेलचा भाव ९९.४९ रुपये इतका झाला आहे. शंभरीच्या दरवाज्यावर डिझेल दर पोहोचले आहे.

हे देखील पहा   

जागतिक कमॉडिटी बाजार मध्ये कच्च्या तेलातील भाववाढ कायम आहे. सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.७३ डाॅलरने Dollar वधारला आणि ७२.२२ डाॅलर झाले आहे. सलग चौथ्या आठवड्या मध्ये तेलाचा भाव सुद्धा वाढला आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८२ डॉलरने वधारला आणि ७०.०५ डॉलर प्रती बॅरल झाले आहे. Petrol-diesel prices go up again

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com