पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ

साम टीव्ही
सोमवार, 8 जून 2020
  • पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ
  • पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 58 पैशांनी वाढ
  • मुंबईत पेट्रोलचा दर 79 रुपये 49 पैसे
  • मुंबईत डिझेलचा दर 69 रुपये 37 पैसे 
  •  कालही पेट्रोल-डिझेलमध्ये झाली होती 60 पैशांनी वाढ
     

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय. मुंबईत आज पेट्रोल 58 पैशांनी महागलंय. यामुळं मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 79 रुपये 49 पैसे इतका झालाय. तर डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झालीय. यामुळं प्रति एक लिटर डिझेलची किंमत 69 रुपये 37 पैसे इतकी झालीय. गेल्या 80 दिवसानंतर काल पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यानंतर काल रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 60 पैशांची वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल 58 पैशांनी महागलंय.

दरम्यान, मिशन बिगिनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु झालाय. पुनश्च हरीओम या अभियानांतर्गत राज्य सरकारने शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार आजपासून तिसरा टप्पा सुरू झालाय. यामध्ये खासगी कार्यालये तसेच सार्वजनिक दळणवळण सेवा सुरू होणार आहे. सर्व दुकाने,  मार्केटस् हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. बेस्ट बसही आजपासून सुरु होणारे. त्यासोबतच सार्वजनिक दळणवळण सेवा सुरू होणार आहे.
1 जूनपासून राज्यात 'मिशन बिगीन अगेन'ला सुरुवात झाली. तर शनिवारपासून राज्यभरात या मिशनचा दुसरा टप्पा सुरु झालाय. राज्य सरकारनं शुक्रवारपासून काही अटींवर दुकानं सुरू करण्याची परवानगी दिलीय.

त्यातच अशी महागाई सामान्य माणसाला अजिबात परवडणारी नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक जणांचे खाण्याचेही वांदे झालेत. मात्र आता पेट्रोल दरवाढीने आणखीनच धडकी भरली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live