दरवाढीमुळं पेट्रोल-डिझेलची विक्री घटली

साम टीव्ही
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

 पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले असले तरी त्याचा इंधनाच्या विक्रीवर परिणाम झालाय. पेट्रोल डिझेलची विक्री घटल्याचं पेट्रोलपंप चालक सांगतात.

इंधन दरवाढीमुळं सामान्यांचं कंबरडं मोडलंय. पूर्वी गाडीची टाकी फुल्ल करणाऱ्या लोकांचा एक वर्ग होता. हा वर्ग आता कमी झालाय. गरजेपुरतं पेट्रोल टाकणाऱ्यांची संख्या वाढलीय. लोकं गाडीत पेट्रोल डिझेल भरताना दहावेळा खिसा चाचपून पाहतायत.

 पेट्रोल जेव्हा साठ-सत्तर रुपयांच्या घरात होतं तेव्हा पन्नासचं पेट्रोल टाकून गावभर फिरणारी तरुणांची एक जमात होती. पेट्रोलनं जेव्हा नव्वदी गाठली तेव्हापासून ही जमात जवळपास गायब झालीय.

 पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले असले तरी त्याचा इंधनाच्या विक्रीवर परिणाम झालाय. पेट्रोल डिझेलची विक्री घटल्याचं पेट्रोलपंप चालक सांगतात.

 बिनाकामाचं गावभर गाडी घेऊन फिरणाऱ्यांची संख्या कमी झालीय. गाडीचं काम असेल तरच घराबाहेर गाडी काढू असं म्हणणारे वाढलेत. त्यामुळं वाहनं आता रस्त्यावर कमी आणि पार्किंगमध्येच जास्त दिसू लागलीयत. साम टीव्ही 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live