VIDEO| चलनी नोटेवर येणार लक्ष्मी मातेचा फोटो ?

 संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

चलनी नोटांवर लवकरच लक्ष्मी मातेचा फोटो छापला जाणार का? अशी चर्चा रंगलीय. कारण लक्ष्मी देवीचा फोटो छापल्यानं अर्थव्यवस्थेला बळकटी येईल असा दावा केला जातोय. देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल,असा सल्ला मोदींना दिला गेलाय. भाजपच्याच एका ज्येष्ट नेते सुब्रमण्यम स्वामींनी हा सल्ला दिलाय.  
इंडोनेशियात नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींनी अजब सल्ला दिलाय. स्वामींच्या या सल्ल्यावर जोरदार टीका होतेय

.

आर्थिक आघाडीवर एकामागोमाग एक झटके भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागतायंत. रुपयाचं अवमूल्यन, वाढती महागाई यामुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक आहे. आर्थिक आघाडीवरची परिस्थिती सुधारण्यासाठी खरं तर देशभरातील अर्थतज्ज्ञ, तसंच विरोधी पक्षांच्या अनुभवी धुरिणांचा सल्ला घेण्याची  आवश्यकता आहे. अशा वेळी नोटेवर एखादं धार्मिक प्रतिक छापून परिस्थिती बदलणार का? असा सवाल सामान्य माणूस विचारतोय. जे सामान्य माणसांना समजतं, ते केंद्रातील धुरिणांना का समजत नाही, असा सवाल विचारावासा वाटतोय.

WebTitle:: Photo of Lakshmi Mate to come on a currency note?

संबंधित बातम्या

Saam TV Live