फोटोग्राफी माझा छंद - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नाईट लाईफ हे सर्वसामान्यांसाठी. मुंबई हे न झोपणारे शहर आहे. कष्टकऱ्यांसाठी साई उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी नाईट लाईफचा उपयोग होऊ शकतो. पब, बार यासाठी फक्त नाईट लाईफ नाही, सर्वसामान्यांसाठी हे खूप गरजेचे आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मी वेगळा निर्णय घेतला आहे. ब्रँड ऍम्बेसिडर नेमण्यापेक्षा मी स्वतः तेथे जाणार आहे. फोटोग्राफी हा माझा छंद असून, त्यात गैर काय आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (मंगळवार) प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की एकदे जंगल, लेणी अशा ठिकाणी मी नामवंत लोकांना घेऊन जाऊऩ तेथे असलेल्या सोईसुविधांबद्दल स्वतः पाहणी करणार. तसेच तेथे काय सुधारणा आवश्यक आहे, याविषयी पाहणी करणार आहे. त्यामुळे याचा फायदा तेथील विकासासाठी होईल, हे नक्की आहे. फोटोग्राफी हा माझा छंद असून, तो मी सोडलेला नाही. यापुढेही मी तो कायम ठेवेल. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणी आहेत ज्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकतो. 

नाईट लाईफ हे सर्वसामान्यांसाठी
मुंबई हे न झोपणारे शहर आहे. कष्टकऱ्यांसाठी साई उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी नाईट लाईफचा उपयोग होऊ शकतो. पब, बार यासाठी फक्त नाईट लाईफ नाही, सर्वसामान्यांसाठी हे खूप गरजेचे आहे. 

Web Title: CM Uddhav Thackeray says tourism sector development


संबंधित बातम्या

Saam TV Live