तोंडाला पदर लावून बाजारात जाणाऱ्या आजीला पोलीस निरीक्षकांनी लावला मास्क

विश्वभुषण लिमये
मंगळवार, 11 मे 2021

जिल्ह्यातील उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी अक्कलकोट बस स्थानकासमोर थांबून मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वाटप करून आपल्या प्रशासकीय कार्याची वेगळी चुणूक दाखवून देत पोलीस जनतेचे मित्र असल्याचा अनुभव दिला

सोलापूर :  जिल्ह्यातील Soalpur उत्तर अक्कलकोट Akkalkot पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी अक्कलकोट बस स्थानकासमोर थांबून मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वाटप करून आपल्या प्रशासकीय कार्याची वेगळी चुणूक दाखवून देत पोलीस Police जनतेचे मित्र असल्याचा अनुभव दिला. PI puts a mask over the old woman's face

हे देखील पहा - 

मास्क का घातला नाही म्हणून दंड अथवा शिक्षा करण्याऐवजी मास्क भेट देऊन लोकांचे कृतीतून जनजागरण करणाऱ्या गोपाळ पवारांबद्दल अक्कलकोट शहर तालुक्यात कृतीशील परिवर्तन घडवणारा अधिकारी म्हणून सकारात्मक चर्चा होऊ लागली आहे. आपल्या नातीसोबत नाकाला पदर लावून बाजारात जाणाऱ्या आजीबाईना स्वतः पोलीस निरीक्षकांनी मास्क लावला.

नागरिकांनो सावधान ; घरगुती गैस मधून निघाले तब्बल 1 ते दीड लीटर पाणी

एक संवेदनशील अधिकारी काय असतो हे त्यांच्या कृतीतून दिसून आले. त्याचबरोबर शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई न करता मास्कचे वाटप, प्रत्येकाला मास्कचे महत्व आणि कोरोनाचे गांभीर्य अक्कलकोट पोलीस समजावून सांगताना पहायला मिळत आहेत.  PI puts a mask over the old woman's face

Edited By : Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live