पिंपरी चिंचवड मध्ये रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गोपाळ मोटघरे
सोमवार, 10 मे 2021

कोरोना साथीच्या काळात रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या पुन्हा एकदा पिंपरी  - चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत. या टोळीकडून वाकड पोलिसांनी तब्बल २१ रेमेडिसीवर इंजेक्शन साठा जप्त केला आहे.

पुणे: कोरोना Corona साथीच्या काळात रेमेडिसीवर इंजेक्शनचा Remdesivir injection काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या पुन्हा एकदा पिंपरी  - चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत. या टोळीकडून वाकड Wakad पोलिसांनी police तब्बल २१ रेमेडिसीवर इंजेक्शन साठा जप्त केला आहे. In Pimpri Chinchwad a gang involved in black marketing of remdesivir injection was exposed

वाकड पोलिस स्टेनशचे कर्मचारी नाकाबंदी Blockade करत असताना पोलिसांनी रेमेडिसीवर इंजेक्शन जप्त केले आहेत. कृष्णा रामराव पाटील, निखिल केशव नेहरकर आणि शशिकांत रघुनाथ पांचाळ असे रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींची नाव आहेत. यातील कृष्णा पाटील हा थेरगाव येथिल क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून कामाला आहे, तर निखिल नेहरकर हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून शशिकांत पांचाळ याचा थेरगाव परिसरात आयुश्री मेडिकल आहे. 

हे देखील पहा -

शशिकांत पांचाळ याने स्तःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या जवळील  रेमेडिसीवर इंजेक्शन कृष्णा पाटील आणि निखिल नेहरकर यांना विक्रीस दिले होते. असे पोलिस तापसात उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेले रेमेडिसीवर इंजेक्शने हे क्रिस्टल हॉस्पिटल मधिल गोदावरी मेडकील आणि ओंनेक्स हॉस्पिटल मधिल आयुश्री मेडिकलच्या नावाने अलॉट करण्यात आले होते. In Pimpri Chinchwad a gang involved in black marketing of remdesivir injection was exposed

परिचारिकांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक

मात्र आरोपी हे गरजू रुग्णांना रेमेडिसीवर इंजेक्शन देण्या ऐवजी इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याच पोलिस तापसात निष्पन्न झालं आहे. पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून वाकड पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या तिन्ही आरोपी कडून 21 रेमेडिसीवर इंजेकशन, एक कार, दोन दुचाकी आणि मोबाईल  असा 10 लाख 60 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live