रुग्ण मृत्यूच्या "डेथ ऑडिट" माहिती कडे पिंपरी चिंचवड प्रशासन फारसे गंभीर नाही 

pcmc
pcmc

पुणे:  कोरोना Corona वायरसची लागण झालेले अनेक रुग्ण बरे होतात, मात्र ज्यांचा कोरोना वायरस मुळे अवेळी मृत्यू होतो. अशा रुग्णांना  इतर काही आजार होते का? किंवा उपचारात दिरंगाई झाली का ?  यासह अनेक बाबी "डेथ ऑडिट" Death Audit रिपोर्ट मधून स्पष्ट होतात. मात्र असं "डेथ ऑडिट" करण्याकडे पिंपरी - चिंवंचवड महानगरपालिका प्रशासन Pimpri Chinchwad Municipal Corporation अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. Pimpri Chinchwad Municipal Corporation administration neglects to conduct Death Audit reports

  • कोरोना ग्रस्त रुग्णावर कधी उपचार सुरू झाले ? 
  • उपचार पद्धती कोणती होती?
  • कोरोना ग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन, व्हेनटिलेटर मिळालं होतं का ? 
  • कोणताही गंभीर आजार नसताना रुग्णाचा अवेळी मृत्यु का झाला?
  • कोरोना बाधितांच्या मृत्युचे ऑडिट सात दिवसात करणे अनिवार्य
  • डेथ ऑडिटचा अहवाल उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांना सादर करणे बंधनकारक
  • उपचार पद्धतीची पुढील दिशा स्पष्ट होण्यासाठी डेथ ऑडिट आवश्यक
  • खासगी रुग्णालयतील उपचार पद्धतीवर नियंत्रणसाठी डेथ ऑडिट आवश्यक

हे देखील पहा -

या माहिती आधारे  "डेथ ऑडिट" काढने आवश्यक असते. 

पिंपरी - चिंचवड Pimpari Chinchwad शहरामध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याच चित्र बघायला मिळत आहे. मात्र त्याचवेळी  कोरोना ग्रस्तांच्या मृत्यूने इथे अक्षरशः थैमान घातलं असून, दुसऱ्या लाटेत इथला मृत्युदर दुपटीने वाढल्याच आकडेवारीतून स्पष्ट होत आणि प्रत्येक मृत्यूच डेथ ऑडिट केलं गेलं नसल्यानेच इथला मृत्यदर आटोक्यात येत नसल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने Rayat Vidyarthi Parishad केला आहे. 

पिंपरी - चिंचवड  शहरातील डेथ ऑडिट करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने वाय सी एम हॉस्पिटलवर YCM Hospital सोपवली आहे. दरम्यान आता आम्ही डेथ ऑडिट करण्यास सुरुवात केली असून 40 वर्षवया खालील 5 तरुणांचा मृत्यू केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने झाला असल्याच डेथ ऑडिट मधून स्पष्ट झाल्याची माहिती वाय सी एम हॉस्पिटलचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली. मात्र खासगी रुग्णालयात झालेल्या कोरोना मृत्यूंचं डेथ ऑडिट केले गेले किंवा नाही या बाबद आपण अनभिज्ञ असल्याचं वाबळे यांनी स्पष्ट केल. त्यामुळे "डेथ ऑडिट" करण्या बद्दल प्रशासन फारस गंभीर नसल्याचं वास्तव समोर आलं. Pimpri Chinchwad Municipal Corporation administration neglects to conduct Death Audit reports

पिंपरी चिंचवडमध्ये उपचार घेणाऱ्या शहरतील व शहराबाहेरील 4 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे , या मृत्यूचं वेळेत डेथ ऑडिट झालं असत, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आरोग्या बाबत अधिक सावधानता बाळगता आली असती. त्याच बरोबर  नागरिकही अधिक सतर्क झाले असते. याहूनही महत्वाची बाब म्हणजे डेथ ऑडिट न करणारे खासगी रुग्णालय नेमकी कोणती उपचार पद्धती अवलंबितात यावरही नियंत्रण राहील असतं, मात्र तसं न झाल्याने कोरणाबाधितांच्या मृत्यूबाबद इथला सभ्रम कायम आहे. 

Edited By- Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com