पिंपरी - चिंचवड मधील तरुणाचा कोविड सेंटर्समध्ये "रिचार्ज टू डिस्चार्ज" असा अनोखा उपक्रम... 

गोपाल मोटघरे 
मंगळवार, 1 जून 2021

पुणे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाट्याला येणारं नैराश्य आणि एकटेपणामुळे त्यांचा आजार अधिक बळावत असल्याची बाब लक्षात घेत, एका तरुणानं पिंपरी - चिंचवड मधील कोविड सेंटर्समध्ये "रिचार्ज टू डिस्चार्ज" असा अनोखा उपक्रम राबविलाय. 

पुणे : कोरोनाबाधित Corona रुग्णांच्या वाट्याला येणारं नैराश्य आणि एकटेपणामुळे त्यांचा आजार अधिक बळावत असल्याची बाब लक्षात घेत, एका तरुणानं पिंपरी - चिंचवड Pimpri - Chinchwad मधील कोविड Covid सेंटर्समध्ये "रिचार्ज टू डिस्चार्ज" असा अनोखा उपक्रम राबविलाय, ज्यामुळे कोरोनाबाधितांच मानसिक स्वास्थ स्थिर राहण्याबरोबरच कोरोना मुक्तीचे प्रमाणही वाढलं आहे. Pimpri Chinchwad youths Recharge to Discharge initiative at Covid Centers 

कोरोना बाधितांच्या वॉर्डमध्ये ward जाऊन वेग-वेगळ्या थेरपी देत त्यांच्याशी हितगुज साधणा-या, या तरुणाचं नाव शिवप्रसाद महाले Shivprasad Mahale असे आहे. पिंपरी चिंचवडच्या कोविड सेन्टर मधील कोरोना बाधित डॉक्टरांऐवजी हा तरुण येण्याची वाट बघत असतात, या मागचं कारण काय आहे. ते तुम्हीच जाणून घ्या.

सांगलीत अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी..

शिवप्रसादने मोकळ्यापणानं मारलेल्या गप्पांमुळे कोरोना बाधितांच्या चेहऱ्यावरील उमटलेले भाव त्यांच्या जगण्याची उभारी देतात आणि  म्हणूनच शिवप्रसाद ने आपल्या उपक्रमाला "रिचार्ज टू रिचार्ज" असं नावं दिल आहे. Pimpri Chinchwad youths Recharge to Discharge initiative at Covid Centers  

हे देखील पहा -

शिवप्रसाद करत असलेल्या ह्या अनोख्या उपचारपद्धतीची दखल शासन स्तरावर घेतली जाणं अपेक्षित आहे. मात्र, तो पर्यंत आपण आपल्या ओळखतील कोरोना बधितांशी मोकळेपणाने बोलून त्यांचा मानसिक आधार बनू आणि सकारत्मक विचारांनी ते डिस्चार्ज होई पर्यँत त्यांना रिचार्ज करत राहूया.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live