निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरीचा डंका वाजवून घेण्याची संधी साधली. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सुरवातीच्या काही मिनिटांमध्ये सरकारची कामगिरीच वाचून दाखविली.

गोयल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

 • सकारात्मक योजनांमुळे भारतात मोठी परकीय गुंतवणूक
 • सरकारचा तोटा 6 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आला
 • अन्न, प्रवास, सेवा स्वस्त झाल्या
 • देशातील नागरिकांचा जीवनस्तर सुधारला
 • राज्यांना आधीच्या निधीच्या तुलनेत 10 टक्के अधिक निधी मिळण्यास सुरवात
 • बँकांची सद्यस्थिती देशाच्या समोर ठेवण्याचे आम्ही आरबीआयला सांगितले
 • जीएसटी लागू करण्याचे सरकारचे मोठे पाऊल
 • तीन बँकांवरील पीसीए निर्बंध हटविण्यात आली आहेत
 • जीएसटीमुळे आर्थिक आरोग्य सुदृढ झाले
 • बँकिंग व्यवस्था पारदर्शक होण्यासाठी मोठे निर्णय घेतले
 • आता बँकांच्या कर्जवसुलीत वेग, त्यामुळे कार्यप्रणाली सुधारली
 • रियल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणली, रेरा सारखा कायदा आणला
 • आम्ही स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविली
 • स्वच्छ भारत योजनेतून 
 • 5 लाख 45 हजार गावांमध्ये शौचालये उभारली

Web Title: Piyush Goyal all praises of Modi Government in Budge 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live