PSL च्या सुरवातीपूर्वीच खेळाडू गंभीर जखमी; पाहा VIDEO

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात जावे लागले आहे. त्याच्या ओठांना गंभीर दुखापत झाली आहे.

पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) दुसरा टप्पा 9 जूनपासून सुरू होणार आहे. कराचीमधील जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात कोविड-१९ (COVID-19) संसर्ग झाल्याची घटना आढळल्यानंतर पीएसएलला तीन महिन्यांपूर्वी तहकूब करण्यात आले होते. आता पुन्हा पीएसएल सुरू होण्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. सरावा दरम्यान लाहोर कलंदर्स संघाचा स्टार खेळाडू बेन डंक (Ben Dunk) जखमी झाला आहे.(Players seriously injured before the start of the PSL)

जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात जावे लागले आहे. त्याच्या ओठांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रत्यक्षात असे घडले की सराव सत्रात बेन डंकने झेल घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बॉल त्याच्या ओठावर आदळला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला 7 टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. बेन डंकने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे देखील पाहा

फ्रँचायझीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की डंक लवकरच दुखापतीतून सावरेल आणि या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सामन्यात त्याच्या संघाकडून खेळताना दिसू शकेल. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये डंकने 4 सामन्यात 40 च्या सरासरीने 80 धावा केल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने गुरुवारी सांगितले की, पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले लाहोर कलंदर्स स्पर्धेच्या 15 व्या सामन्यात तिसर्‍या स्थानावर असलेल्या इस्लामाबाद युनायटेडशी खेळताना दिसणार आहे.

मोदी-ठाकरे भेट; ठाकरे सरकारवर मुनगंटीवारांनी केली 'हि' टीका

24 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल. पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सहा डबल-हेडर असणार आहेत. त्यानंतर,  21 जूनला क्वालिफायर आणि पहिला एलिमिनेटर सामना खेळला जाईल. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 


संबंधित बातम्या

Saam TV Live