ICC Player of the Month: श्रीलंका बांग्लादेशच्या खेळाडूंची वर्णी

icc player of the month
icc player of the month

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali), श्रीलंकेचा फिरकीपटू प्रवीण जयविक्रम आणि बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) यांना मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) मे महिन्याचे सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केले आहे. आयसीसीने स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्राइसशिवाय आयर्लंडच्या गॅबी लुईस आणि लेआ पॉलची मे महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवड केली आहे. हसनने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत 14 बळी मिळवले तर प्रवीणने श्रीलंकेकडून पदार्पण करीत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात 16.11 च्या सरासरीने 11 बळी घेतले.(Players from Sri Lanka and Bangladesh honored with ICC awards)

प्रवीणने कसोटीमधील पदार्पणात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेला दुसर्‍या कसोटीत विजय नोंदविण्यास मदत मिळाली. मुशफिकूरने श्रीलंकेविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात मुशफिकूरने १२५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. महिला गटात कॅथरीन नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या क्रमवारीत प्रथम दहामध्ये स्थान मिळवणारी प्रथम स्कॉटिश पुरुष किंवा महिला खेळाडू ठरली आहे. आयर्लंडविरुद्धच्या चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 96 धावा करून तिने पाच विकेट्स देखील घेतल्या होत्या. त्यावेळी तिचा इकॉनॉमी रेट 4.76 होता. 

हे देखील पाहा 

स्कॉटलँडविरुद्ध  चार टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गॅबीने 116 धावा केल्या तसेच या सामन्यांमध्ये तिची सरासरी 29.00 होती, तर स्ट्राइक रेट 116 चा होता. ती या मालिकेतली सर्वात यशस्वी फलंदाज होती. दुसर्‍या सामन्यात तिने 47 धावा आणि चौथ्या सामन्यात 49 धावा केल्या. आयर्लंड आणि स्कॉटलंड दरम्यानच्या मालिकेत नऊ बळी घेणारी लेआ पॉल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com