VIDEO | कोरोना इंजक्शनमध्ये भेसळ करुन रुग्णांच्या जीवाशी खेळ

साम टीव्ही
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020
 • सावधान! कोरोनावरील इंजेक्शनमध्ये भेसळ
 • इंजेक्शनमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
 • पैशांसाठी सुरूय रुग्णांच्या जीवाशी खेळ

 एकीकडं कोरोनाची लस बनवण्यासाठी सगळेच देश काम करतायत. तर दुसरीकडे काही भामटे इंजेक्शनमध्ये भेसळ करतायत. रुग्णांच्या जीवाशी खेळ करून पैसे कमावण्याचा धंदा सुरू झालाय. कोण करतंय इंजेक्शनमध्ये भेसळ? वाचा आणि सावध व्हा.

कोरोनावर अजून लस आली नाहीये. पण, कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी भारतात अनेक लसींचा वापर केला जातोय. डॉक्टर्स डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून रुग्णांची सेवा करतायत. पण, काही भामटे या संकटातही रुग्णांच्या जीवाशी खेळ करून पैसे कमावतायत. अशाच एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पदार्फाश केलाय. कोरोना उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर अनेक डॉक्टर्स टोसिलिझुमॅब या इंजेक्शनचा वापर करतात. त्याचाच फायदा घेत भेसळ करणाऱ्या टोळीनं बनावट इंजेक्शन तयार करून मार्केटमध्ये लाखोंच्या किंमतीत विकलेयत.

इंजेक्शन भेसळखोर कसे भेसळ करत होते, आणि रुग्णांची कशी केलीय फसवणूक वाचा -

 • भेसळखोराने काळ्याबाजारात 58 हजार रुपयांना एक मूळ औषध विकत घेतलं
 • मूळ औषधासारखाच हुबेहूब दिसणारा बॉक्स प्रिंट करून नंतर तशाच बाटल्या विकत घेतल्या
 • अस्थमासाठी वापरले जाणारे औषध मिसळून बनावट इंजेक्शन्स तयार केली
 • बनावट इंजेक्शन्स तयार करून तिप्पट भावाने विक्री केली
 • 58 हजारांना मिळणाऱ्या इंजेक्शनमध्ये भेसळ करून 1 लाख रुपयांना विकायचा
   
 • आता इंजेक्शनमध्ये भेसळ करणाऱ्याला दिल्लीतून मुंबई पोलिसांनी अटक केलीय. त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीय. पोलिस त्याच्यावर कारवाई करतीलच. पण, बनावट इंजेक्शन विकून या टोळीनं किती जणांचे जीव धोक्यात घातले असतील. त्याला जबाबदार कोण? याच्यासारखेच अनेक भामटे पैशांसाठी रुग्णांच्या जीवाशी खेळताय. त्यामुळे तुम्ही कोरोनावर उपचार घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या.


संबंधित बातम्या

Saam TV Live