काम आवडलं तर मला मत द्या- नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

नागपूर - मला मत मिळेल किंवा नाही, याची चिंता करीत नाही. काम आवडलं तर मला  मत द्या, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘विदर्भ मुस्लिम इंटेलेक्‍युच्युअल फोरम’तर्फे अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी सनदी अधिकारी जफर महमूद, आयपीएस अब्दुल रहमान, फोरमचे अध्यक्ष डॉ. शकील सत्तार, नवी दिल्लीतील झकात फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सय्यद जफर महमुद, ॲड. फिरदोस मिर्झा, ॲड. परवेज सिद्दीकी, अब्दुल रौफ शेख उपस्थित होते.

आतापर्यंत काँग्रेस, भाजप, जनता दलाचे सरकार सत्तेत आले. मात्र, मुस्लिमांच्या सामाजिक समस्या कायम आहेत. मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे याचे समर्थन करतो.  मात्र, राजकारणात प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर विकास होईल का? याचासुद्धा विचार व्हायला पाहिजे. डॉक्‍टरकडे जाताना आपण तो कोणत्या समाजाचा आहे, याचा विचार करीत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजाने वागायला पाहिजे. आम्ही जात मानत नाही, असेही गडकरी म्हणाले.

ज्या भागात मला मते मिळाली नाही, त्या भागात मोठ्या प्रमाणात कामे केली. तिथल्या लोकांना घरे दिली. मात्र, निवडणुकीत तिकीट देताना काय होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्या समाजाला कोणत्या भागात किती मते मिळू शकतात याचा विचार सगळ्याच पक्षाकडून केला जातो.

उमेदवाराचे ‘इलेक्‍टिव्ह मेरिट’ बघितल्या जाते. सरकारने चांगले काम  केले पाहिजे हे गरजेचे आहे. मात्र, खरच ते पर्याप्त आहे का? त्यासाठी आपणसुद्धा काम  करण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योजकता घरातून झाली पाहिजे. धार्मिक आणि राजकीय या दोन बाबी वेगवेगळ्या ठेवायला पाहिजे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Web Title: Work Vote Nitin Gadkari Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live