3 मोठ्या बातम्या | लॉकडाऊनमुळे प्रचंड हाल होणाऱ्या मजुरांच्या व्यथा

साम टीव्ही
शनिवार, 2 मे 2020
  • पायी निघालेल्या गोंदिया येथील बांधकाम मजुराची आत्महत्या
  • चंद्रपूरमध्ये 1500 मजूरांनी रोखला महामार्ग
  • घरी परतण्यासाठी हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर
  • नाशकातून दुसरी श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना

पायी निघालेल्या गोंदिया येथील बांधकाम मजुराची आत्महत्या

हैदराबाद येथून पायी निघालेल्या गोंदिया येथील बांधकाम मजुराने आत्महत्या केली आहे.  हैदराबाद ते गिरड असा तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास करून देखील हताश आणि निराश झालेल्या या मजुराची पायपीट गळफासाने संपली. तब्बल साडेतीनशे किलोमीटर पायपीट केल्यानंतर हतबल झालेल्या मजुराने आपलं आयुष्य संपवलंय. गळफास लावून एका मजुराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. वर्ध्यात ही घटना घडली आहे. मूळच्या गोंदियाच्या असलेल्या या मजुराने आपलं आयुष्य संपवलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वाधिक भरडला गेला तो मजूर. मजुरांच्या हातचा रोजगार गेला आणि त्यांच्यासाठी सारेच रस्ते लॉक झाले. कोसोदूर असलेल्या गावच्या मार्गावर अडचणींचे पहाड उभे राहिले. त्यातून अनेक मजुरांनी घरच्या ओढीने पायपीट सुरू केली. ही पायपीट अनकांच्या जीवावर बेतली. यात गोंदियातील मजुराचेही नाव जोडले गेले आहे. . हे सारेच मन सून्न करून टाकणारे आहे. गोंदिया येथील अमरसिंह मडावी या ४० वर्षीय  मजुराच्या बाबतीत ही शोकांतिका घडली आहे.

घरी परतण्यासाठी हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर

गुजरातमधे मजुरीसाठी गेलेल्यांना गुजरात सरकारनं सीमावर्ती भागात येऊन सोडायला सुरुवात केली होती. गेल्या तीन दिवसांपासून नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळ मजुरांना सोडण्यात येत होतं. मात्र कालपासून गुजरात राज्यातून परत येणाऱ्या मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे.  मजुरांनी आपल्या घरी परत जाण्यासाठी पायी किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास सुरू केलाय. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने येणाऱ्या या मजुरांची सीमावर्ती भागात कोणतीही तपासणी केली जात नाहीय. तपासणी विना या मजुरांना प्रवेश दिला जात आहे.  यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातील कामगार आहेत. तसेच या मजुरांसाठी शासनातर्फे पाणी किंवा जेवणाचीही  कोणतीही सोय करण्यात आलेली नाही.

चंद्रपूरमध्ये 1500 मजूरांनी रोखला महामार्ग

चंद्रपूरमध्ये 1500 मजूर रस्त्यावर उतरल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळी असलेले यूपी, बिहार आणि बंगालमधील हजारो मजूर अचानक महामार्गावर आंदोलन करु लागले. शापोरजी-पालनजी कंपनीकडे या बांधकामाचं कंत्राट असून लॉकडाऊनमुळे हे मजूर इथे अडकलेत.या काळात कंपनीने पैसे तसंच रेशन देण्याचं आश्वासन दिलं होतं..मात्र ते न मिळाल्याने कामगार वर्ग संतापला. या  संतप्त कामगारांनी काही काळासाठी चंद्रपूर-हैदराबाद महामार्ग रोखून धरला..तसंच आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या अशी मागणी केली..दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मजुरांना शांत केलं

नाशकातून दुसरी श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना

दरम्यान, नाशिकमधून आज दुसरी श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना झाली. सकाळी साडे दहा वाजता लखनौच्या दिशेने परप्रांतीय मजूर, भाविक आणि विद्यार्थ्यांना घेऊन ही ट्रेन सुटली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. श्रमिक ट्रेन या पॉईण्ट टु पॉईण्ट धावणार आहेत. प्रवासापूर्वी प्रत्येक प्रवाशाची चाचणी करण्यात आली. कोरोनाची लक्षणे नसल्याची खात्री करूनच त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली. एका ट्रेनमधून फक्त हजार लोकांनाच प्रवास करता येणार आहे. मूळ गावी पोहोचलेल्या मजुरांच्या आरोग्याची तपासणीकरून त्यांचे घरातच. किंवा गरजेनुसार आरोग्यसेवा केंद्रात ते विलगीकरण होईल...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live